spot_img
spot_img
spot_img

कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महानगरपालिकांमधील कामगार प्रतिनिधींचा राज्यव्यापी मेळावा रविवार दिनांक १० ऑगस्ट, २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात सकाळी ११.०० वाजता आयोजित करणेत आला होता. मेळाव्याचे प्रस्ताविक फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात यांनी केले. या राज्यव्यापी  बृहन्मुंबई, पुणे, ना गपुर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई,  सोलापुर,  मिरा-भाईंदर,  भिवंडी-निजामपुर,  अमरावती,  नांदेड-वाघाळा,  कोल्हापुर,  पनवेल,  उल्हासनगर,  सांगली-मिरज-कुपवाड, मालेगांव, जळगांव, लातुर, धुळे, अहिल्यानगर, परभणी, इचलकरंजी आदी महानगरपालिकांचे कामगार नेते उपस्थित होते.   

या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये राज्यातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून सदर मागण्या व प्रश्न तडीस लावण्यासाठी दिनांक २४ ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका कामगार, कर्मचारी यांचा राज्यव्यापी मेळावा स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगांव येथे आयोजित करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये विविध महानगरपालिकेतील कामगारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने ज्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ३ ते ४ महिन्यांपासून मासिक वेतन न मिळणे, जुनी पेन्शन योजना लागु करणे, वाढते कंत्राटीकरण, कंत्राटी कामगारांना मनपा सेवेत कायम करणे, रुग्णालयांमध्ये नर्सिंग कौन्सिल आणि सलीम मर्चंट अवॉर्डप्रमाणे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचे प्रमाण निश्चित करणे तसेच राज्यातील सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांना चांगली वैद्यकीय सेवा लागु करणे आदी प्रश्नांवर चर्चा करणेत आली.

वरील मागण्यांसंदर्भात दिनांक २४ ऑगस्ट, २०२५ रोजी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये हे प्रश्न सोडवून, कामगारांच्या प्रलंबित मागण्या राज्य सरकारकडून मान्य करुन घेण्याचा निर्धार करण्याच्या अनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा मेळाव्यात निश्चित केली जाईल असे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी सांगितले.

आजच्या मेळाव्यात कामगारनेते शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे (पिंपरी-चिंचवड), शशांक राव, रमाकांत बने अशोक जाधव, वामन कविस्कर (बृहन्मुंबई), मोहन तिवारी, चेतन आंबोणकर, वीरपाल भाल (ठाणे), उदय भट, मधुकर राकेश विटकर (पुणे) जगदीश देशमुख (नाशिक), अड. स्वप्निल काशीद (नवी मुंबई), गणेश शिंगे (नांदेड), गौतम खरात (छत्रपती संभाजीनगर), केशव आंधळे (परभणी), दिलीप शिंदे (सांगली), प्रल्हाद कोतवाल (अमरावती), विकास लगारे (इचलकरंजी), दिनकर आवाळे, अजित तिवले (कोल्हापुर) सतिश चंडालिया, आनिल कांबळे (पनवेल), दिपक राव (भिवंडी) बापुसाहेब सदाफुले (सोलापुर), अंकुश गायकवाड (लातुर), प्रविण तंतरपाळे (नागपुर), रमेश जगताप (मालेगांव) आदी पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यातील उपस्थितांचे आभार मोहन तिवारी यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!