शबनम न्यूज | प्रतिनिधी
आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडच्या वतीने शहरातील सर्व महिलांना सुरक्षित, सुलभ आणि मोफत प्रवासाची हमी देण्यात आली आहे. PMPML व PMPL बस सेवेद्वारे महिलांना शिक्षण, नोकरी तसेच दैनंदिन कामांसाठी मोफत व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असा दावा पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष श्री. रविराज काळे यांनी शहरातील सर्व भगिनींना केला आहे.
या उपक्रमाची वैशिष्ट्ये :
- महिलांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी पूर्णतः मोफत बस सेवा मिळणार.
- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात PMPML व PMPL या दोन्ही बस सेवांमधून मोफत प्रवासाचा लाभ मिळणार.
- शिक्षण, नोकरी आणि इतर दैनंदिन गरजांसाठी महिलांना कोणताही खर्च न करता प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
- दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने महिलांसाठी मोफत बस सेवा यशस्वीपणे राबवली आहे. त्याच धर्तीवर पुणे व पिंपरी-चिंचवड येथेही ही सेवा सुरू करून शहरातील सर्व महिलांना प्रवासात आर्थिक व सुरक्षिततेची हमी दिली जाणार आहे.