spot_img
spot_img
spot_img

शनिवार, रविवार, सोमवारी य़ा सुट्टीच्या दिवशी भरता येणार मालमत्ताकर !

  • गुढीपाडवा, रमजान ईद या सुट्टीच्या दिवशीसुध्दा महानगरपालिकेचे कॅश काऊंटर रात्री १२ पर्यंत उघडे राहणार…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन विविध माध्यमातून वारंवार करण्यात येत आहे. अद्यापहीनिवासी मालमत्ताधारकांकडून जवळपास २७४ कोटी तर व्यावसायिक मालमत्तांधारकांकडून १२४ कोटींचा असा एकूण जवळपास ३९८ कोटींचा मालमत्ताकर येणे बाकी आहे. आर्थिक वर्ष संपायला केवळ ३ दिवस शिल्लक असताना करदात्यांना आपला कर भरण्यास सोयीचे व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाची पुढील १८ विभागीय कार्यालये व कॅश काऊंटर्स २९ मार्च रोजी सकाळी ९.४५ ते रात्री ०९ वाजेपर्यंत तसेच रविवार ३० मार्च, गुढीपाडव्याच्या दिवशी व ३१ मार्च, रमजान ईदच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत
(शेवटचा व्यक्ती येईपर्यंत) कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा निर्णय करसंकलन विभागाने घेतला आहे.

तसेच नागरिकांना या कालावधीत मालमत्ताकर भऱण्याबाबत कोणतेही अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक विभागीय कार्यालयांचा पत्ता, संपर्क क्रमांक प्रसिध्द करण्यात येत असून नागरिकांनी तात्काळ आपल्या कराचा भरणा करण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.

नागरिकांना घरबसल्या मालमत्ताकराचा भरणा करण्यासाठी ऑनलाइन माध्यमे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासाठी नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://publicptaxpcmc.in/ या संकेतस्थळावरुन मालमत्ताकराबाबत आवश्यक माहिती भरुन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बी.एच.आय.एम(भीम) यूपीआय, पोस्ट डेबिट कार्ड, पोस्ट क्रेडिट कार्ड, यूपीआय, ईबीपीपी, मोबाईल वॉलेट या ऑनलाइन पध्दतीने मालमत्ताकराचा भऱणा करुन करुन वेळेची बचत करावी. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांना मालमत्ताकर भरण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून करसंकलन भरणा
कार्यालय व विभागीय कार्यालये सुरु असून त्यांचे संपर्क क्रमांक सुध्दा प्रसिध्द करण्यात आले
आहेत. नागरिकांच्या अडचणींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी करसंकलन विभाग कार्यरत
असून नागरिकांनी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मालमत्ताकर भरण्यासाठी
पुढाकार घेऊन आपल्या कराचा भऱणा करण्याचे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले
आहे.

नागरिकांनी मालमत्ताकराचा भरणा करुन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा !

“नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने सर्व
करसंकलन विभागीय कार्यालये व कॅश काऊंटर्स साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा सुरु ठेवली आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेत आपला कर भरुन शहराच्या विकासामध्ये हातभार
लावावा.”

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

नागरिकांच्या सोयीसाठी कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा निर्णय !

“शहरातील सर्व मालमत्ताधारकांना आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये मालमत्ताकराचा
भऱणा करण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुध्दा
शहरातील सर्व कॅश काऊंटर्स सुरु ठेवण्याचा करसंकलन विभागाने निर्णय घेतला आहे.
मालमत्ताधारकांना मालमत्ताकर भऱण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियासुध्दा उपलब्ध करण्यात आली
असून ३१ मार्चपूर्वीच कराचा भरणा करावा.”

– प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!