पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील प्रभाग क्रमांक 27 मधील केके अंजना सोसायटी व केके अंजला सोसायटी या ठिकाणी महिला भगिनींच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे गॅस आणि या महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईनची सुरुवात रक्षाबंधनाच्या दिवशी करण्यात आली सदर गॅस पाईपलाईनचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात व देविदास आप्पा तांबे यांच्या पुढाकाराने करण्यात आले रक्षाबंधनाच्या दिवशी महिला भगिनींना ही एक भेट असल्याचे यावेळी पहावयास मिळाले.
देविदास आप्पा तांबे यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की महिला भगिनींसाठी ही रक्षाबंधनाची भेट आहे अनेक दिवसापासून या नॅचरल गॅस पाईपलाईन साठी आपण प्रयत्न करत होतो ते आज साध्य झाले.
देविदास तांबे यांनी पुढे असेही सांगितले की या परिसरात असे अनेक लोक आहेत जे मागील पाच वर्षात त्यांनी कोणतीही कामे केली नाही परंतु अनेक कामाचे श्रेय घेतात साधे महापालिकेला कोणतेही पाच वर्षात पत्र दिले नाही की कोणतेही काम केले नाही फक्त दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन फोटो काढून आपणच काम केल्याचे दाखवतात श्रेय घेतात व जे काम करतात त्यांचे कामाचे श्रेय तर घेतातच परंतु त्यांच्या कामामध्ये पण लुडबुड करतात व काम बंद करण्यासाठी अनेक लोक शक्कल लढवतात आम्ही आमचे सामाजिक काम पूर्वीपासूनच करत आलो आहे व पुढेही करणार आहोत तसेच येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही तर लोकहिताची कामे आम्ही पहिल्यापासूनच करीत आलो आहे व पुढे करत राहणार असे देविदास तांबे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले यावेळी दोन्ही सोसायटीचे चेअरमन ,सेक्रेटरी, सर्व सभासद व देविदास आप्पा तांबे उपस्थित होते सर्वांनी आप्पा तांबे यांचे आभार व्यक्त केले.