spot_img
spot_img
spot_img

राज्य मनपा कर्मचारी संघटना फेडरेशनची पिंपरी-चिंचवड येथे राज्यव्यापी बैठक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महानगरपालिका- नगरपालिका, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने रविवार दिनांक १० ऑगस्ट, २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या कामगार संघटना  पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघ कार्यालयात आयोजित केली आहे.

सदरच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व महानगरपालि कांचे कामगार संघटना  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठक महाराष्ट्र राज्य महानगरपालिका- नगरपालिका, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून महाराष्ट्रातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी संदर्भात चर्चा करून सर्व महानगरपालिकांच्या कामगार नेत्यांच्या संमतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कामगार मंत्री यांना कामगारांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर वेळ मिळणेकामी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

तसेच महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा एकत्रित मेळावा कामगारांच्या अनेक प्रश्नाबाबत पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाने उभारलेल्या स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगांव येथे येत्या काही दिवसांमध्ये आयोजित करण्याबाबतची चर्चा व पुर्व तयारी म्हणून हा मेळावा घेण्यात येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!