spot_img
spot_img
spot_img

लघुउद्योग संघटनेचे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पुणे येथे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सचिव जयंत कड व संचालक प्रमोद राणे यांनी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना पिंपरी चिंचवड व चाकण औद्योगिक परिसरात महावितरण विषयी येणाऱ्या अडचणीचे निवेदन दिले. या प्रसंगी महावितरणचे  संचालक राजेंद्र पवार, संचालक पालीवार, मुख्य अभियंता काकडे, कार्यकारी अभियंता देवकर, चाकणचे कार्यकारी अभियंता एडके हे उपस्थित होते.

       पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक परिसरातील एम.आय.डी.सी., भोसरी परिसरातील सर्व ब्लॉक, चिंचवडमधील डी-१, डी–२, डी–३ ब्लॉक, संघवी कंपौंड, परमार कॉम्प्लेक्स, आकुर्डी इंड. इस्टेट, एच. ब्लॉक, एफ २ ब्लॉक, पवना, मोरया कॉम्प्लेक्स, सेक्टर ७ व १०, कुदळवाडी, पवारवस्ती, चिखली, तळवडे, शेलारवस्ती, सोनवणेवस्ती, मोशी टोल नाका परिसर शांतीनगर, गुळवेवस्ती, भगतवस्ती, ताथवडे, किवळे  चाकण या ठिकाणी खालील समस्यांचा उद्योजकांना सामना करावा लागत आहे.

उद्योजकांना येणाऱ्या समस्या खालील प्रमाणे.

१. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरामध्ये विजवहनयंत्रणा ५० वर्षे जुनी वा अपुरी झाली हे व आहे त्या विजवहन यंत्रणेवर प्रचंड तान येत आहे,त्यामध्ये सुधारणा करून अद्ययावत करणे जरुरीचे आहे. यामुळे सतत खंडित विजपुरवठ्याला उद्योजकान तोंड द्यावे लागत आहे व प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे व महावितरणचा  महसूल कमी झाला आहे.

२.पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात सहा नवीन सबस्टेशनची उभारणी करावी,

त्यापैकी भोसरी MIDC मध्ये -३, कुदळवाडी-१, तळवडे-१ व सेक्टर ७ आणि १० 

मध्ये -१. यापैकी कुदळवाडी, तळवडे, व सेक्टर ७ आणि १०पिंपरी, एच ब्लॉक साठी 

महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी.

३. कुदळवाडी,  चिखली येथील वीज मीटर काढून नेले आहेत ते उद्योजकांना परत द्यावेत जे शॉप चालू आहेत त्यांना रेग्युलर पावर सप्लाय देण्यात यावा हे मीटर देण्यासाठी दोन महिन्याचे अतिरिक्त सुरक्षा ठेवची मागणी करत आहेत  त्यांची हि मागणी मान्य न करता जुन्या वीज मीटर नोंदी नुसार ते वीज मीटर उद्योजकांना परत करून वीज कनेक्शन चालू करून देण्यात यावे.

.  फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे.

५.  फिडर CRIMPING

६.  फिडरच्या वीज वाहणाऱ्या तारांचे झोल कमी करणे.

७.  फिडर पिलर मधील HRC, फ्युज वायर व आतील खराब झालेले पार्टस बदलणे व 

खराब झालेले दरवाजे बदलणे.

८.  वेगवेगळ्या साईजचे केबल stock मध्ये ठेवणे व गरजेच्यावेळी २४ तास उपलब्ध 

करून   देणे कारण बऱ्याच वेळेला केबल उपलब्ध नसते.

९.  केबल नादुरुस्त वाहन FAULT FINDING VEHICALS ) वेळेवर उपलब्ध करून देणे.

१०.  फिडरची लांबी कमी करणे व त्यासाठी लागणारे BAY BRAKER व केबल्स उपलब्ध   करून बसवून देणे त्यामुळे फिडरवरील विजेचा लोड कमी होऊन तक्रारी कमी होतील.

११.    ओव्हर लोड ट्रान्सफॉरमरवरचा लोड कमी करणे व त्यातील ऑईलची पातळी

आवश्यक  तेवढीच ठेवणे व आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉरमर बसविणे.

१२.  महावितरणच्या पिंपरी चिंचवड औद्योगिक विभागासाठी मंजूर झालेला DPR

कार्यान्वित करणे व नवीन DPR साठी पाठपुरावा करणे.

१३. सध्या अस्तित्वात असलेली स्विचिंग स्टेशन्स ओव्हर लोड आहेत, त्यांची संख्या

वाढविणे.

१४. औद्योगिक परिसरातील संबधित विभागातील लाईनमनची संख्या वाढविणे.

१५. व्हॉटसप ग्रुपमधील तक्रार MSEDCLच्या अधिकाऱ्यांनी बघून त्या तक्रारीचे त्वरित

 निराकरण करावे.

१६. सर्व वीज वाहिन्यांना AB स्विच व GOD बसविणे व सबस्टेशनमधून परमिट 

  घेण्याचे टाळणेसाठी RMU बसविणे यामुळे परमिट घेणेसाठी जो तास ते दिड तास  

 लागतो व त्याकाळात वीज बंद असते त्यातून सुटका होईल.

१७. महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी शटडाऊन घेऊन PREVENTIVE मेंटेनन्सची कामे मार्गी

लावणे.

१८. ज्या ठिकाणी अंडर ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे शक्य आहे त्या ठिकाणी अंडर

 ग्राउंड वीज वाहक केबल्स टाकणे.

१९. महावितरणच्या पिंपरी व चिंचवड विभागातील खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारी प्रचंड

प्रमाणात वाढलेल्या आहेत. या विभागातून सदर तक्रारीकडे दोन दोन तास कोणीही

लक्ष देत नाही. त्यावर उपाययोजना करणे व कायमस्वरूपी कार्यक्षम अधिकारी नेमणे.

२० काही अनोळखी लोकांकडून महावितरणच्या रोहित्र व डी.पी. जवळच टाकाऊ कचरा

 जाळला जातो त्यावर उपाययोजना करणे व फिडर पिलरचे दरवाजे चोरणाऱ्याचा 

पर्दापाश करणे.

२१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महावितरण व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना  यांची एक संयुक्त बैठक घेऊन महापालिका रस्ता खोदाई करतांना महवितरणच्या

केबल्स तोडल्या जातात त्यावर संयुक्तपणे उपाययोजना करणे.

२२.सेंच्युरी एन्का  सबस्टेशन मध्ये व इंद्रायणीनगर सबस्टेशन 50 MV चे ट्रान्सफॉर्मर    

मंजूर झालेले आहेत ते बसविणे.

२३. टाटा सबस्टेशनमध्ये 50 MV चे ट्रान्सफॉर्मर काढून त्या ठिकाणी 100 MV चे ट्रान्सफॉर्मर बसविणे व हे 50 MV चे ट्रान्सफॉर्मर इंद्रायणीनगर व सेंच्युरी एन्का सबस्टेशनमध्ये बसविणे.

२४. चाकण फेज 2 भांबोली प्लॉट क्रमांक c – २२/४, D– 138 व आजूबाजूच्या औद्योगिक परिसरामध्ये पॅक टाईम ( PAK TIME) फिडर हा २० KM लांब असून वारंवार वीज खंडित होवून उद्योगांचे मोठया  प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी RMU व केबल लवकरात लवकर उपलब्ध करून देणे यामुळे PAK TIME फिडरचे विभाजन करता येईल. तसेच या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या EHV मधील 50 MV चा ट्रान्सफॉर्मर 100 MV करणे.

२५. चाकण फेज दोन मधील प्लॉट नंबर C– २२/४ या ठिकाणचे डबल पोल डी. पी. स्ट्रक्चर काढून ते कनेक्शन धारकांच्या जागेत लावणे कारण या ठिकाणी उद्योजकांना त्याच्या गाड्या किंवा मालाच्या गाड्या ये-जा करण्यास अडथळा होत आहे. तो डबल पोल डी. पी. स्ट्रक्चर हलविल्यास या सोसायटी धारकांना त्याचा फायदा होईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!