शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस कडून शहरातील डी पी विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा चे उपाध्यश बापू कातळे यांनी किवळे ग्रामस्थांचे नेतृव्त करत मोर्चा मध्ये सहभाग घेतला. किवळे गावातील STP , STW तसेच के विला समोरील कचरा संकलन केंद्रास परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. किवळे परिसरातील बहुसंख्य नागरिक या आरक्षणामुळे बाधित होत आहेत त्यामुळे परिसरात संतापाची लाट आहे. बापू कातळे यांचे संकल्प फाउंडेशन तर्फे नागरिकांना मुकाई चौक येथे संघटित करण्यात आले आणि पुढे बापू कातळे यांचे नेतृत्वात संघटित नागरिकांनी आपला मोर्चा पिंपरी येथील मुख्य आंदोलन स्थळी वळविला आणि डी पी विरोधात आपला रोष व्यक्त केला.