शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नवीन विकास आराखड्यांमधील डीपी रोड वर रिंग रोड रद्द करण्यासाठी मांडलेल्या विषयाकरिता थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची भेट घेऊन साकडे घालण्यात आले.
तसेच या भेटीदरम्यान थेरगाव मधील प्राधिकरणग्रस्त नागरिकांच्या व्यथा मांडून हक्कांच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करावा, अशी मागणी देखील यावेळी थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी अक्षय कांबळे (अध्यक्ष), दीपक तरडे, गणेश डोंगरे ,हरीश पाठक , निखिल साखळे
निखिल गुरव , आकाश बारणे , कुणाल पवार , आकाश पाटील , नरेंद्र माने ,प्रताप डुंबरे सर , विजय पवार सर, बाळासाहेब पाटील, भरत पवार , संजय ठाकरे , नाथाजी हेगडे , सोमनाथ पागिरे, मनीषाताई सुतार , नंदाताई काकडे माधुरीताई हिवाळे आदी उपस्थित होते.