spot_img
spot_img
spot_img

रक्षाबंधन निमित्त “महिलांसाठी मोफत बस सेवेची दुर्गा ब्रिगेड संघटनेची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा पवित्र सण असून, या दिवशी अनेक महिला व मुली आपल्या माहेरी, भावाकडे किंवा गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात. मात्र या दिवशी प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने अनेक महिलांना उभं राहून प्रवास करावा लागतो किंवा वाहनांच्या प्रतीक्षेत वेळ वाया जातो. या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्ष दुर्गा भोर यांनी शासनाकडे व परिवहन विभागाकडे मागणी केली आहे.

दुर्गा भोर म्हणाल्या, “रक्षाबंधन दिवशी राज्यभर महिलांसाठी एसटी, पीएमपीएल व अन्य सार्वजनिक बससेवा मोफत करावी आणि बसची संख्या वाढवावी.” रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणींना एक दिवसाचा सन्मान म्हणून राज्य सरकारने मोफत बस सेवा जाहीर करावी, ही सामाजिक न्यायाची आणि स्त्रीसन्मानाची खरी अभिव्यक्ती ठरेल.”

प्रमुख मागण्या:

  •  रक्षाबंधनच्या दिवशी (09 ऑगस्ट २०२५) सर्व महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी.
  • पीएमपीएल, एसटी व नगरपालिका बस विभागांनी महिलांसाठी विशेष जादा गाड्या चालवाव्यात.
  • ग्रामीण व निमशहरी भागातही या सेवेचा लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी.
  • बस स्थानकांवर सुरळीत व्यवस्थापनासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत.

दुर्गा ब्रिगेड संघटनेची अपेक्षा – 

महिलांचा सन्मान करणारे हे पाऊल शासनाने उचलावे, जेणेकरून राज्यभरातील लाखो महिलांना प्रवास सुलभ, सुरक्षित व सन्मानपूर्वक करता येईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!