शबनम न्यूज | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे, सर्व संबंधित विभागाने समन्वय साधून हे अभियान यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी
‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर्गत २ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्याबाबत आढावा घेतला.
कदम म्हणाल्या, जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. या अभियानानंतर्गत दुसरा टप्पा ९ ते १२ ऑगस्ट २०२५ तर तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अभियानाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना कदम यांनी दिल्या.
यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.