कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन यांचा उपक्रम
जगामध्ये अनेक नाती जन्माने मिळतात, पण मैत्रीचे नाते हे असे नाते आहे जे आपण स्वतः निवडतो. हे नाते विश्वास, प्रेम आणि निस्वार्थ समर्थनाचे प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा ‘फ्रेंडशिप डे’ याच अमूल्य नात्याचा गौरव करतो. 3 ऑगस्ट रोजी फाउंडेशन मार्फत हा उपक्रम साजरा करण्यात आला . हा दिवस आपल्याला आपल्या मित्रांचे आभार मानण्याची, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि नवीन आठवणी तयार करण्याची अनोखी संधी देतो.
यावेळी प्रभागातील सर्व महिलांनी अतिशय आनंद मध्ये गाणी गप्पागोष्टी डान्स धमाल मस्ती कोणत्याही वयाची परवा न करता महिलांनी फ्रेंडशिप डे चा आनंद उत्सव असतो थाटामाटात साजरा केला.
या कार्यक्रमाचे वेळी सूत्रसंचालन ओंकारेश्वर यांनी केले.
फाउंडेशनचे अध्यक्ष कीर्ती मारुती जाधव यांनी आलेल्या मैत्रिणींचे आभार व्यक्त केले