महिला, युवक, एन एस यु आय काँग्रेसच्या वतीने सत्कार समारंभ
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांची भव्य वर्णी
शहरातील काँग्रेस नेत्यांच्या निवडीने संघटनात्मक कार्याला मिळणार बळ
पिंपरी-चिंचवड प्रतीनीधी दि.६: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती होऊन शहराच्या काँग्रेस संघटनेचा सन्मान वाढला आहे. श्री. मनोज जी कांबळे व श्री. बाबूजी नायर साहेब यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ नेत्या सौ. निगार ताई बारस्कर, श्री. अशोक जी मोरे व श्री. दहार मुजावर यांची सचिवपदी निवड झाली आहे. या गौरवपूर्ण नियुक्तींनंतर पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस महिला, युवक आणि एनएसयूआय कमिटीच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी सौ. सायली किरण नढे, युवक काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ नवले, अॅड. उमेशजी खंधारे, श्री. आबा खराडे, सौ. स्वाती शिंदे, सौ. आशा भोसले, प्रियंका सगट, प्रज्ञा जगताप आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले असून या नव्या नियुक्तींमुळे काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.