पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील साई लक्झरिया सोसायटीने पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल करत 36 kW क्षमतेचा सोलर पॅनल युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन चिंचवड विधान सभा मतदार संघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले
या प्रसंगी शंकर जगताप यांनी सांगितले कि आजच्या काळात वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेसारख्या अक्षय्य ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज आहे. साई लक्झरिया सोसायटीने उचललेले हे पाऊल इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. तसेच स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे जाण्याचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत आमदार जगताप यांनी व्यक्त केले
यावेळी माजी नगरसेविका सविताताई खुळे, सोसायटीचे चेअरमन श्री. सुनील शिंदे , सचिव श्री. संदीप क्षत्रिय, खजिनदार ,. पंकज जयदा, देविदास तांबे, ,गणेश नखाते , यांच्यासह स्वप्न संकुल चेअरमन अविनाश मेश्राम ,सचिव जयदीप पाटील ,कमिटी मेंबर सुदीप आंबेकर ,विनोद पाटील ,व्यवस्थापक संदीप क्षिरसागर ,सिद्धिविनायक विंड चाईम चेअरमन प्रवीण मंत्री ,शिवधाम सोसायटी , रोमन वाटकर, लक्ष्मी भक्ती चेअरमन उमेश पाटील अनेक पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.