शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी या नदीला शहरवासीय पवना माई म्हणून संबोधतात दरवर्षी पवनामाईचे पूजन केले जाते यावर्षी पिंपरी चिंचवड महाविकास आघाडी वतीने पवना माईचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रियंका बारसे, राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, शिवसेनेच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील नेत्या रूपालीताई अल्हाट प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे यांनी सांगितले की खरंतर यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात झाली व आता ऑगस्टमध्ये 90% धरण भरलेले आहे पण तरीही पिंपरी चिंचवड करांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे.धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था झाली असं म्हटलं तरी वावगे नाही .आज पूजन करून सत्ताधारी तसेच पिंपरी चिंचवडचे मा. आयुक्त यांना आम्ही आवाहन करत आहोत की लवकरात लवकर त्यांनी दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून रोजचे रोज नियमित पाणी नागरिकांना मिळेल अशी व्यवस्था करावी.अन्यथा तीव्र आंदोलन करून आमच्या हक्कासाठी आम्हाला लढावे लागेल.पाण्याअभावी महिलांचे रखडलेली कामे ,कामगार वर्ग, तसेच दिवस दिवस एमएसईबीचि लाईट नसेल तर दिवसाआड मिळणार पाणी चार दिवसावर जाते .यात टँकर माफियांचा फायदा होतो कारण याकाळात टँकरची मागणी वाढते. यामुळेच पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत आम्ही हे आंदोलन जागे ठेवणार आहोत
मनपा आयुक्तांना भेटून याबाबतचे निवेदन त्यांना देणार आहोत.आणि तरीही यावर विचार केला गेला नाही तर तीव्र आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात छेडण्यात येणार आहे.तसेच दररोज नियमित पाणी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मिळेल अशी व्यवस्था करावी सध्या दिवस आड पाणीपुरवठा सुरू आहे तो बंद करावा व दररोज नियमित पाणीपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करून आमच्या हक्कासाठी आम्हाला लढावे लागेल असे निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रियंका ताई बार्शी यांनी सांगितले तसेच लवकरात लवकर आपली मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रियंका ताई बारसे यांनी दिला आहे. यावेळी सोनाली पासलकर, जयमाला कदम, तायरा सय्यद , पुष्पा गोपाळे, कान्होपात्रा थोरात, अर्चना बारकुल,गौरी घंटे,कमल धाईंजे रेखाताई, सुशिला पवार, कल्पना घाडगे, विनोद धुमाळे,सचिन निंबाळकर व इतर पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.