शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ड्रेनेज व स्थापत्य विभागाकडून प्रभाग क्रमांक ३१ मधील नेताजी नगर,विनायक नगर येथील ड्रेनेज लाईन,स्टॉर्म वॉटर लाईनची स्वच्छता करून दुरुस्ती करण्यात येत आहेत.
येथील परिसरात पावसाळ्यात सतत अंतर्गत रस्त्यावरील ड्रेनेज लाईन तुंबून रस्त्यावर पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वारंवार येत होत्या.त्याचप्रमाणे स्टॉर्म वॉटर लाईन देखील तुंबत असल्याने स्थापत्य विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता करण्यात आले.
याप्रसंगी अंतर्गत रस्त्यावर वास्तव्य करीत असणारे नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन अधिकाऱ्यांना वारंवार होत असलेल्या त्रासाबद्दल जाब विचारत होते.यावेळी अधिकाऱ्यांनी त्वरित येथील रस्त्याची पाहणी करुन विभागाची सेक्शन मशिनरी वाहन बोलवून घेतले.यावेळी स्वतः समक्ष उभे राहून प्रत्येक ड्रेनेज लाईनच्या चेंबर मधील संपूर्ण गाळ सेक्शन मशिनरीच्या सहाय्याने बाहेर काढून येथील ड्रेनेज लाईन सुरळीत करण्यात आली.
येथील परिसरातील ड्रेनेज लाईनच्या काही चेंबरमध्ये आतील भागात प्लास्टर करण्यात आले नसल्याने अनेकदा ड्रेनेज मधील मैला पाणी स्टॉर्म वॉटर लाईनमध्ये किंवा बोरेल मधे येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे स्थापत्य विभागाने ठेकेदाराला सांगून येथील ड्रेनेज लाईनच्या चेंबरमध्ये आतील प्लास्टर करण्यात आले.यावेळी स्टॉर्म वॉटर लाईनमधील चेंबरची देखील स्वच्छता करण्यात आली.
विकासाची कामे करीत असताना नागरिक सतत सहकार्य करीत असतात.मात्र संबंधित अधिकारी देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे सतत दुर्लक्ष करीत आहेत.याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे अशी मागणी याप्रसंगी येथील नागरिकांकडून करण्यात आली.
अनेकदा रस्त्याने ये-जा करताना हवेतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. ड्रेनेज मधील मैला पाणी पावसाळी चेंबरमध्ये येत आहे. याबाबत येथील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या.मात्र अधिकाऱ्यांकडून सातत्याने केराची टोपली दाखविण्यात येत होती.
आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात संबंधित अधिकारी यांची मी स्वतःभेट घेऊन पाहणी करून घेतली आणि प्रशासनाने कामालाही सुरवात केली आहे.
– संजय मराठे, स्थानिक नागरिक
प्रभाग ३१ मधील तक्रारी नुसार पाहणी करून येथील ड्रेनेज लाईन सेक्शन मशिनरीच्या सहाय्याने गाळ काढून स्वच्छ करण्यात आले आहेत. ड्रेनेज व स्टॉर्म वॉटर लाईनची दुरुस्ती देखील करण्यात आली आहे. सद्य स्थितीत कवडे नगर या भागातही काम सुरू आहे.
– अश्विनी ढोले,कनिष्ठ अभियंता जल:निसारण विभाग.