spot_img
spot_img
spot_img

बौद्धजन मंडळ नेहरूनगरच्या नूतन कार्यकारणी करीता १३ वर्षानंतर बिनविरोध निवडनूक संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बौद्धजन मंडळ नेहरूनगरच्या मागील तिन वर्ष कामकाज करणार्‍या कमिटीने चार दिवसांन पूर्वी जयंती अहवाल व कार्यकारणीचा तिन वर्षाचा कार्य काळ संपल्याने दि. ०३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ०७ वा. बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला नेहरूनगर, संत तूकारामनगर, इंद्रायनी नगर तसेच आसपाच्या भागातील सर्व सभासदानी उपस्थिती लावली होती.

यावेळी प्रथम वरिष्ठ सदस्य पातारे, सदाफूले व मंडळाचे बौद्धाचार्य गायकवाड यांचे हस्ते तथागतांना व बाबासाहेबांना पूष्प अर्पण करण्यात आले. नंतर बूद्ध वंदना घेण्यात आली, व अहवाल सादर करण्यात आला तो सर्वानूमते मान्य करण्यात आला. शेवटी वेळ आली ती नविन अध्यक्ष निवडीची तब्बल १३ वर्षानंतर पहिल्यांदा बिनविरोध अध्यक्षांची निवड झाली पूढील तिन वर्षा करिता प्रकाश नाना जाधव यांची निवड झाली. त्यानंतर सचिव पदा साठी शरद उघडे यांची देखिल बिनविरोधच निवड झाली.

खजिनदार पदासाठी सागर खरात तर उपाध्यक्षाकरिता आनंद नरवाडे व सह सचिव पदा साठी भारती यांची अशी सर्वांचीच बिनविरोध निवड झाल्याने तब्बल १३ वर्षानंतर बिनविरोध निवडनूक झाली यांचा सर्वांना आनंद झाला यावेळी सर्वांनी नवनिर्वाचित कमिटीचे स्वागत व अभिनंदन केले यावेळी सर्वांना पेढे भरवत नविन कमिटीने आनंद व्यक्त केला यावेळी कमिटीने बौद्धजन मंडळ नेहरूनगर या धार्मिक मडळात फक्त बौद्ध धम्माकरिताच काम केले जाईल असे सांगण्यात आले. यावेळी शांताराम बनसोडे, भास्कर कदम, चरणदास वाघमारे, जाधव , बापू कदम दत्तात्रय रोकडे,पवन कदम असे मंडळाचे सर्वच सभासद उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!