शबनम न्यूज | प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या मार्गदर्शनात पिंपरी चिंचवड शहरातील भाट नगर प्रभाग मध्ये मैत्री दिनाचे औचित्य साधत महिलांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये प्रभागातील महिलांनी आठवले गटामध्ये काम करण्याची इच्छा दर्शवत पक्षाचे ध्येय धोरणे तसेच रामदास आठवले यांच्या दिन-दलित गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य पाहत सर्व महिलांनी रामदास आठवले यांचे नेतृत्वामध्ये आठवले गटात गटाच्या वतीने शहरांमध्ये काम करण्याचे इच्छा व्यक्त केली.
या बैठकीचे आयोजन वृषाली ताई कदम यांनी केले, यावेळी विशेष सहकार्य अनिता ताई कांबळे यांनी केले. यावेळेस सर्व महिला उपस्थित होत्या, यावेळी सावित्री ताई कदम, कांताबाई वाघमारे ,ममता ताई पवार ,सारिका ताई म्हस्के,रेखा ताई म्हात्रे,प्रितीताई ओहोळ ,ममता ताई येल्लाळे ,सरिता ताई कुशवाह प्रज्ञा ताई कदम शिवानी ताई पवार ,राधाताई खंडागळे ,नफिसा ताई खान, मंगल ताई साळवे,कौशल्याताई सोनवणे उपस्थित होते.