पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश भवन’ उभारण्याची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
तीन दिवसांच्या उत्साहानंतर आज पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चा समारोप झाला. हजारो खान्देशी बांधवांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आपल्या लाडक्या कानबाई मातेला भावपूर्ण निरोप दिला. या उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश भवन’ उभारण्याची मागणी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात आली. या सोहळ्याला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार कुणाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्सवाच्या आयोजकांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. रात्री, श्री कानबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुपने सादर केलेल्या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय केले.
कानबाई उत्सवाचा उत्साह आणि ‘खान्देश भवन’ची मागणी
पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या खान्देशी बांधवांसाठी हा उत्सव संस्कृती आणि परंपरेच्या जतनाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी आयोजित मुख्य कार्यक्रमात प्रमुख संयोजक नामदेव ढाके यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना ‘खान्देश भवन’ उभारण्याची मागणी केली. “पिंपरी-चिंचवडमध्ये खान्देशातून आलेले लाखो बांधव रोजगारासाठी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. आपल्या मूळ गावापासून दूर असले तरी, आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याची त्यांची इच्छा आहे. ‘खान्देश भवन’ हे अशा लोकांसाठी एक सांस्कृतिक केंद्र बनेल. या ठिकाणी खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, नोकरी-व्यवसायासाठी मार्गदर्शन केंद्र, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह अशा अनेक सुविधा उपलब्ध होऊ शकतील. हे भवन खान्देशी समाज बांधवांसाठी एक हक्काचे व्यासपीठ ठरेल.”, असे ढाके यांनी सांगितले. आमदार मंगेश चव्हाण, आमदार शंकर जगताप, आमदार राजू मामा भोळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि खान्देशी समाज बांधवांनी या मागणीला पाठिंबा दिला.
या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये खान्देशी बांधवांनी आपली संस्कृती जपली आहे. ‘खान्देश भवन’ची मागणी योग्य असून, यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.” त्यांच्या या आश्वासनामुळे उपस्थितांमध्ये आनंदाची लाट पसरली.
‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात कानबाई मातेला निरोप
तीन दिवसांच्या उत्साहानंतर आज पिंपरी-चिंचवडमधील ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ चा समारोप झाला. डोळे पाणावलेल्या हजारो खान्देशी बांधवांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात आपल्या लाडक्या कानबाई मातेला निरोप दिला. पारंपरिक वेशभूषा आणि लोकगीतांच्या साथीने निघालेल्या विसर्जन मिरवणुकीने पिंपरी-चिंचवडमध्ये एक भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ८ वाजता आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी मिरवणुकीत शिरपूर येथील गोल्डन बँडने आपल्या सुमधुर संगीताने वातावरण अधिक भक्तिमय केले. मिरवणुकीत सहभागी झालेले पुरुष, महिला आणि लहान मुलांनी पारंपरिक अहिराणी गाण्यांवर नृत्य करत कानबाई मातेच्या जयजयकार केला. आपल्या कुलदेवतेच्या निरोपावेळी अनेकांचे डोळे भरून आले होते. मिरवणुकीचा समारोप जाधव घाट, रावेत येथे झाला. येथे सर्व खान्देशी समाज बांधवांनी एकत्र येऊन भावपूर्ण वातावरणात कानबाई मातेचे विसर्जन केले. या उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील सर्व खान्देशी समाज एकत्र आला. या उत्सवाने केवळ धार्मिक परंपराच नव्हे, तर खान्देशी संस्कृतीचा वारसा जपण्याची आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा दिली, अशी भावना उत्सवाच्या आयोजकांनी व्यक्त केली.
या भव्य उत्सवाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेविका शारदाताई सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे, जितेंद्र पाटील, हेमंत चव्हाण, शंकर पाटील, भगवान निकम, प्रदीप पटेल, विलास महाजन, मनोहर पाटील, अण्णा सावंत, भाऊसाहेब पाटील, राजेंद्र देसले, अजय गुजर, गोविंद चौधरी, महेंद्र पाटील, नरेंद्र चर्हाटे, अरविंद सैंदाणे, लीलाधर मगरे, गिरीधर पाटील, मिलिंद चौधरी, महेंद्रसिंग गिरासे, श्रीकृष्ण काळे, मनोज ब्राह्मणकर, बापूसाहेब पिंगळे, प्रकाश लोहार, किरण चौधरी, अमोल पाटील, हेमंत झोपे, निनाद खर्चे, नकुल महाजन, शरद पाटील, पंकज निकम, मोतीलाल भामरे, सोपान पाटील, शिवाजी पाटील, सुनील मराठे, कैलास रोटे, भूषण महाजन, संदीप महाजन, रवी महाजन, जयंत पाटील, सारिकाताई पवार, पियुषा पाटील, कल्पना बागुल, विजया मानमोडे, हेमंत पाटील, सचिन सानप, रवींद्र ढाके, चंद्रकांत ढाके, शशिकांत पाटील, राजेंद्र देसले, मनोहर पाटील, रुपेश पाटील, सुरेश पाटील, प्रदीप हिरे, चंद्रकांत पाटील, दीपक पाटील,दीपक महाजन, नंदू महाजन, विकास पाटील, अरविंद महाजन, योगेश महाजन, योगेश चिनावले, विशाल पाटील, शिवाजी पाटील, जगदीश पाटील, सुनील मराठे, देविदास पाटील, विजय जावळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आणि खान्देशी बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. प्रमुख संयोजक नामदेव ढाके यांनी सर्व स्वयंसेवक, सहभागी मंडळे आणि खान्देशी बांधवांचे आभार मानले. पुढील वर्षी हा उत्सव आणखी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.