शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे : आई-वडील दैवत आहे. त्यांचे आणि शिक्षकांच्या आज्ञेचे पालन करावे, अभ्यासाबरोबर खेळातही जागरूक राहून नियमित सराव करत राज्य, देश पातळीवर क्रीडा स्पर्धांत भाग घेऊन नावलौकिक प्राप्त करा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय बेसबॉल, सॉफ्टबॉल खेळाडू वैष्णवी सायकर यांनी दिली. त्या गणेशखिंड येथील प्राथमिक विद्या मंदिर (मॉडर्न) शाळेत वार्षिक कला क्रीडा बक्षीस समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.
नुकतेच गणेशखिंड येथील प्राथमिक विद्या मंदिर (मॉडर्न) शाळेत मुख्याध्यापक विठ्ठल मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. २२ मार्च) वार्षिक कला क्रीडा बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष विशाल थोरात, प्रेरणा पडवळ, दीपक मराठे, सतीश लिंबेकर या प्रसंगी उपस्थित होते. या वेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक शंकररावजी कानिटकर व विद्येचे आराध्य दैवत सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शाळेची माजी विद्यार्थिनी व राष्ट्रीय खेळाडू वैष्णवी सायकर यांच्या हस्ते वर्षभर कला क्रीडा स्पर्धांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. डॉ. भानुदास कुलाळ यांनी सूत्रसंचालन केले.