शबनम न्यूज | प्रतिनिधी
तडीपार आदेशाचा भंग करून मावळ तालुक्यातील बधलवाडी येथे आलेल्या तडीपार गुंडास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयताही हस्तगत केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सचिन धर्माजी बधाले (वय ३५, रा. बधलवाडी, ता. मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अंमलदार आसिफ इलीयास सय्यद यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बधाले याला परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त यांनी ९ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन वर्षाकरिता संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. मात्र, तो शासनाची परवानगी न घेता बधलवाडी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता मिळून आला.