शबनम न्यूज | प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाऊसाहेब भोईर यांचे वाढदिवस दरवर्षी विविध कार्यक्रमाने तसेच सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याही वर्षी येत्या 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यामध्ये खास करून महिलांसाठी मंगळवार (दि. 5) ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता खास महिलांसाठी लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर येत्या बुधवार (दि. 6) ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता एक सुंदर संगीत ‘एक हसीन सफर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा, असे आवाहन भाऊसाहेब भोईर मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.