राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अतिश आनंदाराव बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा रद्द
जवळचा सहकारी स्व.रोहित शिवाजी सुतार यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश आनंदाराव बारणे यांचा 2 ऑगस्ट रोजी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता,परंतु त्यांच्या जवळचे सहकारी स्व.रोहित शिवाजी सुतार यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने हा सोहळा रद्द करण्यात आला.
आपल्या जवळचा सहकारी मित्र दगावल्याने त्याच्या स्मरणार्थ अभिष्टचिंतन सोहळ्यादिवशी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत सक्षम सोशल फाउंडेशन मोशी यांच्याकडून भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या.मोठ्या प्रमाणावर यावेळी रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळाली.
या भव्य रक्तदान शिबिरा वेळी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार.मा.श्री.विलासशेठ लांडे,राष्ठ्रवादी महिला शहर अध्यक्षा कविताताई आल्हाट,सिल्वराईज ग्रुपचे डायरेक्टर.संतोषशेठ बारणे,माजी नगरसेवक रवीभाऊ लांडगे, माजी नगरसेवक.वसंतशेठ बोराटे,माजी नगरसेविका.मंदा ताई अल्हाट,सामाजिक कार्यकर्ते दत्ता मोकाशी,राजू भाऊ सस्ते,रमेश शेठ गायकवाड,सौ वंदनाताई आल्हाट, राजेंद्र ओझरकर,काळुराम सस्ते,राम सासवडे,संदीप सस्ते, प्रशांत सस्ते, गणेश सस्ते,अशोक ढोकळे मामा,स्वप्नील सोनवणे, व्यंकटेश सोनवणे तसेच सर्व जेष्ठ नागरिक व सहकारी मित्र परिवार आणि सक्षम सोशल फाऊंडेशन व सर्व सोसायटीतील चेअरमन, सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व राजकीय,शैक्षणिक व सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्र परिवार यांनी सदिच्छा भेट दिली आणि याच मला खऱ्या अर्थाने शुभेच्छा आणि आशीर्वाद असे भावना यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना अतिश बारणे यांनी काढले.
हे भव्य रक्तदान शिबिर शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी पकवान हॉटेल,बँक्वेट हॉल, बारणे पाटील चौक, बारणे वस्ती, मोशी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडले.