शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विविध विभागातील बाबुराव कायंदे,मुकेश जगताप, निलेश टिळेकर तसेच नागरिक उपस्थित होते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रजी राजवटीत प्रतिसरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वस्तात अन्न धान्य पुरवठा, लोक न्यायालय, बाजार व्यवस्था तसेच युद्ध शाळा सुरू केली. त्यामध्ये देशप्रेमी युवकांना युद्ध कलेचे प्रशिक्षण दिले गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत ते निवडून आले होते.