श्री दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून दि.०२-०८-२०२५ रोजी समीर लॉन्स,रावेत येथे शिधापत्रिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रावेत-किवळे-विकासनगर-मामुर्डी प्रभागातील लोकांची शिधापत्रिका संदर्भात अनेक कामे या ठिकाणी करण्यात आली. आपल्या संपूर्ण परिसरात वाढलेली लोकसंख्या त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध ्न जिल्ह्यातून भागातून कामानिमित्त शिक्षणाकरिता स्थलांतरित झालेल्या नागरिक व कुटुंबांचे नवीन शिधापत्रिका बनवणे, राशन कार्ड स्थलांतर, कुटुंबातील सदस्यांचे नाव वाढवणे, कमी करणे,KYC व इतर दुरुस्ती कामे या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली.
“ONE NATION-ONE RATION CARD”प्रणाली संपूर्ण देशात आणि राज्यात अंमलबजावणी झाल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींनातोंड द्यावे लागत होते. तसेच अन्नपुरवठा विभागातही सर्वसामान्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. नागरिकांना शासनाच्या विविध लोक- कल्याणकारी योजनांचे लाभ घेण्याकरिता तसेच विभिन्न शासकीय,शैक्षणिक सुविधांकरिता शिधापत्रिका हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. मुख्यतः गरजू लाभार्थींना अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या अन्नसुरक्षा योजनांचा लाभ घेता यावा व कोणताही लाभार्थी वंचित राहू नये याकरिता ह्या उपक्रमातून सदर लाभार्थींचे अडचणींचा निवारण करण्यात आले.
या मेळाव्यात सुमारे ६४० हून अधिक नागरिकांचे शिधापत्रिका संदर्भातील विविध कामे करण्यात आली. या उपक्रमातून लाभ घेतलेल्या सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून येत होते.
सदर उपक्रमाला अन्नपुरवठा विभाग, निगडी येथील डॉ. क्षीरसागर साहेब (पुरवठा विभाग प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.चैताली गायकवाड (पुरवठा निरीक्षक), सौ.रेशमा कुंभारे(वरिष्ठ लिपिक), श्री.शुभम तांबे, श्री. गणपत राजे यांचे संपूर्ण उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच उपक्रमासाठी श्री.धर्मपाल तंतरपाळे, सौ.सिंधुताई तंतरपाळे, श्री.राहुल भोंडवे, सौ.माधुरी सावळे, सौ.वैशाली वाकचौरे, श्री.संतोष म्हस्के, सौ.सविता शिवले, श्री. चंद्रकांत गाडे यांचेही बहुमूल्य योगदान व सहकार्य लाभले.
याप्रसंगी श्री.संतोष(आप्पा) भोंडवे, श्री.सुनील भोंडवे, श्री.संतोष भोंडवे, श्री. अजय भोंडवे, श्री.प्रशांत महाजन, श्री. सचिन गावडे, श्री.अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.








