शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांसाठी “आम आदमी पार्टी” च्या वतीने आयोजित करण्यात आलेली अरविंद चषक हाफ-पिच क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली.
या भव्य स्पर्धेचे उद्घाटन अजित फाटके पाटील (कार्याध्यक्ष, आम आदमी पार्टी – महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शहरातील अनेक युवकांनी आपल्या संघासोबत सहभाग नोंदवत स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.
स्पर्धेतील विजेता संघ पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक – प्रतीक 11
द्वितीय क्रमांक – के. निलेश दादा आंबेकर
तृतीय क्रमांक – सुमित चोंदे
या स्पर्धेला आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याचे समन्वयक अमित भाऊ म्हस्के यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
त्यांनी तरुणांशी संवाद साधत, त्यांच्या ऊर्जा, नेतृत्वगुण आणि सामाजिक सहभागाचं कौतुक केलं.
या कार्यक्रमाचे आयोजन रविराज काळे युथ फाउंडेशन आणि शौर्य ग्रुप यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. “तरुणांनी सामाजिक आणि शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खेळाकडे वळावं, तसेच स्पर्धेमार्फत बंधुता, सहकार्य आणि नेतृत्व निर्माण होईल,” असे यावेळी आयोजकांनी सांगितले.
या स्पर्धेला मिळालेला भरघोस प्रतिसाद हेच दाखवते की तरुण पिढी सकारात्मक बदलासाठी सज्ज आहे.