सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचा-यांची जबाबदारीने काम करण्याची पध्दत,सेवाभाव व आठवणी कायम स्मरणात राहतील – सह आयुक्त मनोज लोणकर
पिंपरी, दि. २ ऑगस्ट :- महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे कामकाज करून सेवानिवृत्त होणारे आपले सहकारी अधिकारी,कर्मचारी हे पुढील जीवनात वेगवेगळ्या वाटांवर प्रवास करणार आहेत. त्यांची जबाबदारीने कामकाज करण्याची पध्दत,सेवाभाव आणि त्यांच्या आठवणी सेवानिवृत्तीनंतरही कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले आणि सेवानिवृत्तांना आरोग्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक,पिंपरी येथे माहे जूलै २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ३१ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ७ अशा एकूण ३८ कर्मचाऱ्यांचा सह आयुक्त लोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास उप आयुक्त सचिन पवार,संदीप खोत,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, बायोकेमिस्ट मीना सोनवणे,लॅब टेक्निशियन उमा जाधव,मनाली मुसळे,सुजाता साखरे,कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे,नथा मातेरे,नितीन समगीर तसेच महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माहे जुलै २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, उप अभियंता विजयकुमार शिंदे, राजकुमार सूर्यवंशी, चंद्रशेखर कुर्ले, मुख्याध्यापिका अनिता रोडगे, स्मिता बांदिवडेकर, अंजना बारावे, लेखाधिकारी चारुशीला जोशी, ग्रंथालय प्रमुख कल्पना जाधव, कार्यालय अधिक्षक नामदेव लांडगे, राहुल जगताप, लेखापाल किरण शिवरात्री, मुख्य लिपिक देविदास परांडे, वंदना कुंभार, लॅब टेक्निशियन शुभांगी वैद्य, एक्सरे टेक्निशियन शलमोन मिसाळ, फार्मासिस्ट शेखर बागुल, लिपिक रमेश बारापात्रे, रसूल शेख, प्लंबर सखाराम मडके, हनुमंत देवकर, जनरेटर ऑपरेटर अनिल जगताप, वायरमन विलास तावरे, रखवालदार नरसय्या आडेप, मजूर रामदास कटके, पांडुरंग भाईप, बाळू काटे, सफाई कामगार नंदा साळवे,नवनाथ शेटे, डॉग पिग स्कोड कुली अनिल मोझे यांचा समावेश आहे.
तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सफाई सेवक चंद्रशेखर शेलार, सुरेश शिवरकर, सफाई कामगार पुष्पा बनसोडे, अर्चना रोकडे, गटरकुली अनंता दळवी, मोतीराम धोत्रे, कचरा कुली महादेव बोटे, यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया वाकडे यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.