पुणे : जिल्ह्यात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी १ ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ म्हणून साजरा करण्यात करण्यात आला. तसेच यावर्षी महसूल दिनापासून १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत ‘महसूल सप्ताह २०२५’ साजरा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
याअंतर्गत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी उत्कृष्ट कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करणेत आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले आला.
या सप्ताहानुसार जुन्नर येथे निवासी नायब तहसीलदार सारिका रासकर यांच्या हस्ते महसूल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार समारंभ करण्यात आला तसेच त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ, आस्थापना विषयक कामकाजही करण्यात आले. मुळशी येथे तहसीलदार विजयकुमार चोबे यांच्या अध्यक्षतेखाली व उप अधीक्षक भूमी अभिलेख मुळशी स्वप्ना पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती मुळशी येथे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, रेशन कार्ड व इतर दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
बारामती येथे आजी, माजी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला. तसेच भारतीय संघातून क्रिकेट खेळलेले रवींद्र जगदाळे यांचा सत्कार करण्यात आला. इंदापूर यथे पुरवठा विभागाअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. कर्मचारी व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा संवाद आयोजित करण्यात आला.
पुरंदर येथे उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना तहसिलदार यांचे हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. दौंड येथे महसूल सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या आस्थापनाविषयक बाबींचा आढावा घेऊन अडचणींचे निराकरण करणे तसेच सेवापुस्तके अद्यावत करणे व e HRMS प्रणालीवर माहिती अद्यावत करणे या बाबींचे नियोजन करण्यात आले.