मा. नगरसेवक नाना काटे यांची तत्काळ मदत !
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आज दि. १ ॲागस्ट रोजी पिंपळे सौदागर येथील पीके चौक या ठिकाणी एक अपघात झाला चिचवड येथील एक व्यक्ती एक्टीवा गाडीने पीके चौक या ठिकाणाहुन कोकणे चौक चा दिशेने जाताना RMC गाडीचा खाली येवुन अपघात झाला असुन जागीच मृत्यु झाला असून या अपघाताची बातमी कळताच मा. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी त्वरीत सांगवी पोलीस विभाग, सागंवी वाहतुक विभाग, ॲम्बुलन्स यानां ही माहीती कळवुन घटनास्थळी सर्व मदत पोहचवली. तसेच वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक, व सांगवी पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक यांना या बेशिस्त वाहन चालक जड वाहतुक करणार्या वाहनावर योग्य ती कारवाई करण्याचा सुचना दिल्या आहेत.