शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जागतिक तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे जिल्हा प्रशासन, कामगार विभाग आणि पोलिसांनी संयुक्तिक मोहिम राबवून बुधवारी (३० जुलै) एकूण १२ पिडीत कामगारांची सुटका करण्यात करण्यात आली, याबद्दल पिडीत कामगारांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
याबाबत इंडिया लेबरलाइन या संस्थेला तक्रारीच्या अनुषंगाने गुळ बनविण्याच्या युनिटमध्ये पिडीतांकरिता बचाव मोहीम राबवण्यात आली, पैठण, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या ज्यामध्ये ७ मुलांसह एकूण १२ पीडितांचा समावेश होता. त्यांना आगाऊ रक्कम देण्यात आली, त्यांच्या हालचालींवर मर्यादा घालून त्यांना २ वर्षे शारीरिक छळ करण्यात येत होता, तसेच त्यांना कामावरून काढण्यात आले होते.
याप्रकरणी संदीप बाळू दुबे विरुद्ध बंधपत्रित कामगार प्रणाली (निर्मूलन) कायदा, १९७६ आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत प्राथामिक खबरी अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेता कामगारांना सर्व प्रक्रिया बंधनकारक कामगार मानक कार्यपद्धतीनुसार २४ तासांच्या आत करण्यात पूर्ण करुन कामगारांची सुटका करण्यात करण्यात आली आणि त्यांना सुटका प्रमाणपत्रे जारी करण्यात आली.जिल्हा प्रशासनाने कामगारांना संभाजीनगर येथील त्यांच्या मूळ गावी पैठण येथे सुरक्षितपणे परत जाण्याची व्यवस्थाही केली.
या कारवाईत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगार हक्क आणि सुरक्षा संघटना समितीच्या कॅरोल परेरा, ॲड. देवभक्त महापुरे श्री. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक रूपेश चव्हाण, दीपक सहभागी होते, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.