spot_img
spot_img
spot_img

न्युमरोस मोटर्सतर्फे मल्टीपर्पज ई- स्कूटर डिप्लोस मॅक्स पुण्यात लाँच

विविध उपयोगांसाठी तयार करण्यात आलेली ही ई- स्कूटर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि टिकाऊ

वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेशांत आतापर्यंतची सर्वात मोठी १३.९ दशलक्ष किलोमीटर्सची पायलट टेस्ट करणारी पहिली भारतीय ओईएम

पुणे, २६ मार्च २०२५ न्युमरोस मोटर्स या आधुनिक आणि देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहने बनवण्यात आघाडीवर असलेल्या ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर कंपनीने मल्टी- युटिलिटी ई स्कूटर, डिप्लोस मॅक्स पुण्यात लाँच केली आहे. हरित वाहतुकीची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या डिप्लोस मॅक्सद्वारे कंपनीने वैयक्तिक वाहतूक सुविधा क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यासाठी कंपनीने डिप्लोस प्लॅटफॉर्मअंतर्गत विविध उपयोगांसाठी हे वाहन तयार केले आहे. हे वाहन सुरक्षा, विश्वासर्हता आणि टिकाऊपणाचे प्रतीक असून ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा पुरवण्यासाठी आदर्श आहे. डिप्लोस मॅक्सची एक्स शोरूम पुणे, किंमत केवळ १,१३,३९९ रुपये आहे.

कंपनीने भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी पायलट टेस्ट घेतली असून त्यामध्ये १३.९ दशलक्ष किलोमीटर्सचे अंतर पार करण्यात आले आहे. अशी मोठी पायलट टेस्ट घेणारी कंपनी भारतातील पहिलीच ओईएम ठरली आहे. जबरदस्त सुरक्षा, टिकाऊपणा आणि विश्वासार्हता यांसह डिप्लोस स्कूटर्सच्या श्रेणीने विविध भौगोलिक प्रदेश सहजपणे पार करत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेचा नवा मापदंड रचला आहे. यासह कंपनी भारतातील ईव्ही स्कूटर्सचे भविष्य नव्याने प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे.

डिप्लोस प्लॅटफॉर्म अत्याधुनिक इंजिनियरिंग आणि नाविन्यपूर्ण डिझाइनचा वापर करून बनवण्यात आला असून त्याद्वारे ग्राहकांना पूर्णपणे कनेक्टेड व सफाईदार अनुभव दिला जातो. हा अनुभव सुरक्षा, विश्वासार्हता आणि टिकाऊपणा या तीन तत्वांवर आधारित असतो.

सुरक्षा: डिप्लोस प्लॅटफॉर्ममध्ये ड्युएल डिस्क ब्रेक्स, हाय परफॉर्मन्स एलईडी लायटिंग आणि अत्याधुनिक स्मार्ट वैशिष्ट्ये देण्यात आली असून त्यात थेफ्ट अलर्ट्स, जिओ फेन्सिंग, व्हिइकल ट्रॅकिंग यांसारख्या उच्च दर्जाच्या सुरक्षा सुविधांचा समावेश आहे.

विश्वासार्हताः चासिस, बॅटरी, मोटर, कंट्रोलर यांसारख्या वाहन यंत्रणा दीर्घकाळ टिकतील आणि सातत्याने दर्जेदार कामगिरी करतील याचा विचार करून डिझाइन, इंजिनियर आणि समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

टिकाऊपणाः यातली मजबूत, चौकोनी चासिस आणि रूंद टायर्स दीर्घकाळ टिकणारे असून त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागांवर चांगली पकड मिळते व ते बराच काळ टिकते.

न्युमरॉस मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रेयस शिबुलाल म्हणाले, ‘न्यूमरॉस मोटर्समध्ये आम्ही शाश्वत यंत्रणेचा पाया रचण्यासाठी हरित व कार्यक्षम वाहन सुविधा देण्याचे

उद्दिष्ट ठेवले आहे. डिप्लोस प्लॅटफॉर्म नाविन्यपूर्णता, सुरक्षा आणि पर्यावरणाप्रती वाटणारी जबाबदारी यासाठी वाटणाऱ्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. भारतीय बनावटीचे आणि सुरक्षित, टिकाऊ व विश्वासार्ह वाहन उपलब्ध करून देत आम्ही आमच्या ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्याचे आणि भारत व जगभरातील हरित वाहतूक क्षेत्राला भरीव योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे लाँच आमचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवहार्य डिझाइन यांचा मेळ घालण्यावर असलेला भर दर्शवणारे आहे. त्याद्वारे ‘गेट इट डन’ या तत्वानुसार वाहतूक क्षेत्राच्या भविष्याला आकार देता येईल आणि जग कायमच ‘ऑलवेज मूविंग ठेवता येईल,

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!