spot_img
spot_img
spot_img

“ऑल सीनियर सिटीझन असोसिएशन”च्या वार्षिक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शत्रुघ्न काटे यांची प्रमुख उपस्थिती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आज गुरुवार दि. ३१/०७/२०२५ रोजी ऑल सीनियर सिटीझन असोसिएशन यांची वार्षिक सभा बासुरी बॅंक्वेट हॉल, पिंपळे सौदागर याठिकाणी सुसंस्कृत आणि स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी वरिष्ठ नागरिकांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा सादर केला.आरोग्य,मनोरंजन, सामाजिक सहभाग व समाजहिताच्या विविध क्षेत्रातील कार्याची माहिती सभेत मांडण्यात आली.

शत्रुघ्न काटे यांनी म्हटले की, “वरिष्ठ नागरिक हा समाजाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांचा अनुभव, विचार आणि मार्गदर्शन युवकांना योग्य दिशा दाखवते. अशा सामाजिक संस्थांशी जुळून काम करताना मला नेहमी अभिमान वाटतो.”

यावेळी शत्रुघ्न काटे, संजय भिसे, कुंदाताई भिसे, जगन्नाथ काटे, निर्मलाताई कुटे,वृषालीश्रीमती मरळ, ईश्वरलाल चौधरी तसेच सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष,कार्यकारिणी सदस्य व शहरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!