शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड परिसरातील किवळे तापकीर नगर, रावेत भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येची गरज लक्षात घेता सिम्बॉयसिस कॉलेज, इंदिरा कॉलेज, जे एस पी एम कॉलेज, बालाजी कॉलेज, डी वाय पाटील कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सोयीसाठी पीएमपीएल बस मार्ग सुरू करावा, अशी मागणी माजी आमदार अश्विनी जगताप यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन पी एम पी एल चे व्यवस्थापक पंकज देवरे यांच्याकडे देण्यात आले.
चिंचवड मधून वरील सर्व शिक्षण संस्थां कडे जाणारा विशेष बस मार्ग सुरू करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे आमदार अश्विनी जगताप यांनी केली आहे. यावेळी आमदार अश्विनी जगताप यांच्यासोबत माजी नगरसेवक राजेंद्र गावडे व गणेश कवठेकर उपस्थित होते.