शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिवंगत नगरसेवक जावेद रमजान शेख यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त अनाथ मुलांना शिक्षण उपयोगी साहित्य व अन्नदान पुनरुस्थान समरसता गुरुकुलम आश्रम शाळा, चिंचवडगाव येथे करण्यात आले.
यावेळी दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या पत्नी फहमिदा जावेद शेख उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन शिवसेना उपशहर प्रमुख निखिल दळवी यांनी केले होते. यावेळी त्यांच्या समवेत गोविंदराव शिंदे, सोमनाथ दादा काळभोर ,ताहीर जावेद शेख, कृष्णा माने, यज्ञेश वाघमारे यांच्या हस्ते अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले.