spot_img
spot_img
spot_img

माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या माध्यमातून महिलांसाठी टू व्हीलर प्रशिक्षण वर्ग प्रशिक्षण वर्ग पूर्ण केलेल्यांना लर्निंग लायसनचे वाटप

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील गवळीनगर प्रभागातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांच्या माध्यमातून महिलांना टू व्हीलर शिकवण्याचे प्रशिक्षण वर्गाचा कालावधी नुकताच पूर्ण झाला. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ज्या महिलांना टू व्हीलर चालवता येत नाही अशा महिलांना गाडी चालवण्याचे शिक्षण देण्याची देणे ही आज काळाची गरज असल्याचे ओळखून त्यांनी हा वर्ग सुरू केला व वर्ग पूर्ण झाल्यानंतर त्यांना लर्निंग लायसनचे वाटप करण्यात आले.

मुलांना शाळेत सोडणे ,क्लासला सोडणे, नोकरीला जाणे येणे, भाजीपाला – दवाखाना या बाबींसाठी इतरांवर अवलंबुन रहावे लागत नाही .यासाठी टू व्हीलर येणे आवश्यक असल्याचे सांगून महिलांना सक्षम करणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे या दृष्टिकोनातून आपण या टू व्हीलर प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली असल्याचे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी म्हटले आहे.

हौस म्हणा वा गरज म्हणा गाडी प्रत्येकीला चालवता यायलाच हवी हा त्यांचा अट्टाहास असून गाडी चालवता आल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढतो हा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे असे प्रियांका बारसे यांनी म्हटले आहे.

येथून पुढे दुसऱ्या बॅचचेे नियोजन त्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!