शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन आणि चंद्रभागा कॉर्नर महिला बचत गट यांच्या माध्यमातून ‘चला खेळू मंगळागौर’कार्यक्रम चंद्रभागा कॉर्नर,रावेत येथे अत्यंत उत्साहात पार पडला. श्रावण महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या या मंगळागौर सोहळेला मोठ्या संख्येत पारंपरिक वेशभूषेत महिलांनी उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमादरम्यान अनेक पारंपरिक खेळ सादर करण्यात आले जसे की फुगडी, झिम्मा, लाटाबाई लाटा इ. विविध कार्यक्रमात-खेळांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.माझ्या लाडक्या माता-भगिनींना होणाऱ्या नवरात्र-दांडिया उत्सव सोबत मंगळागौर चा आनंदही घेता यावा या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रिया दिपक भोंडवे आणि मोनाली संतोष भोंडवे यांच्या मार्गदर्शनात आणि चंद्रभागा कॉर्नर येथील सर्व महिला बचत गट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मोनाली संतोष भोंडवे यांनी उपस्थित सर्व स्पर्धक प्रेक्षक महिलावर्ग आणि मान्यवरांचे आभार मानले.