spot_img
spot_img
spot_img

सामाजिक व राजकीय दृष्ट्या, लोकप्रिय व्यक्तिमत्व, “सरिताताई अरुण साने”

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे प्रत्येक राजकीय पक्ष व प्रत्येक इच्छुक उमेदवार महानगरपालिकेच्या निवडणुकीची मागील तीन ते चार वर्षापासून आतुरतेने वाट पाहत आहे. आता महानगरपालिका निवडणूक लवकरच होत असल्याने इच्छुक उमेदवारांची चर्चाही सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेक इच्छुक उमेदवार कामालाही लागले आहेत, याच पिंपरी चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक पंधरा मधून ज्या उमेदवाराच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे ते नाव म्हणजे शिवसेनेच्या महिला शहर प्रमुख सरिता अरुण साने.

सरिता ताई साने यांची पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. पिंपरी चिंचवड शहरातील त्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला शहराध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच महिला सक्षमीकरण उपक्रम त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राबविले जातात त्यांच्या सरिता साने सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

सरिताताई साने यांनी सरिता साने सखी मंच या आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांचे संघटन उभे केले आहे. अनेक महिलांना मदतीचा हात त्यांनी आपल्या सखी मंच द्वारे दिला आहे.आपल्या प्रभागाच्या विकासा साठी कटिबद्ध, संयमी, शांत व सर्वांना आपलेसे करणारे, सामाजिक बांधिलकी असणारे ,जबाबदार व्यक्तिमत्व, सर्वांच्या मदतीला धावून जाणे, दुसऱ्यांचे दुःख आपले दुःख समजून धीर देणे यामुळे सरिता ताई साने या लोकप्रिय नेत्या म्हणून ओळखले जातात.शिवसेना पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनात सध्या सरिताताई साने यांचे राजकीय व सामाजिक कार्य सुरू आहेत.

महिला सक्षमीकरण उपक्रमात महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, महिलांना स्वतःचे व्यासपीठ मिळावे याकरिता सरिता ताई साने नेहमी महिला बचत गटांना दरवर्षी गणेश जयंती निमित्त आयोजित त्यांच्या कार्यक्रमात स्टॉल उपलब्ध करून देतात, या माध्यमातून अनेक महिलांना, महिला बचत गटांना लाभ मिळतो.सरिता साने सखी मंच वतीने दरवर्षी महिलांना एकत्र आणण्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करून महिलांना संघटित करण्याचे काम सरिताताई साने यांनी केले आहे.पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरातील सामुदायिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सरिता ताई साने नेहमी सक्रिय असतात.

आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सरिताताई साने यांनी आपली तयारी सुरू केली आहे. प्रभागाच्या नागरिकांसाठी विविध उपक्रम त्या नेहमी राबवत असतात प्रभागातील नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात याकरिता त्या नेहमी तत्पर असतात.तसेच आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये सांस्कृतिक भवन उभे राहावे यासाठी सरिता ताई साने सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आल्या आहेत . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागात अनेक मूलभूत सुविधा देणारे उपक्रम ते राबवित आहेत तसेच प्रभागातील अनेक समस्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात.

शिवसेनेच्या माध्यमातून सरिता ताई पक्ष बांधणीचे काम योग्य योग्य पद्धतीने करत आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या त्या महिला शहर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नोकरी महोत्सव, दिवाळी विसावा, दहावी बारावी विद्यार्थ्यांचे गुणगौरव, करिअर मार्गदर्शन, रोजगाराच्या संधी, असे अनेक सामाजिक उपक्रमातून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक कुटुंबांना सरिता ताई साने यांनी लाभ मिळवून दिला आहे.

सरिता ताई साने यांनी मागील 2017 मध्ये मनपा निवडणूक लढविली परंतु काही थोड्याफार फरकाने त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले परंतु या अपयशामुळे खचून न जाता त्यांनी आणखीन ताकदीने आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले प्रभागातील नागरिकांच्यासाठी विविध लाभदायक उपक्रम राबविले मागील अनेक वर्षापासून त्या सातत्याने सामाजिक कार्यात व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत , पुढील काळ हा राजकीय दृष्ट्या सरिता ताई साने यांच्यासाठी अनुकूल असल्याचे मत अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!