spot_img
spot_img
spot_img

शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळा

 

पुणे, ३० जुलै २०२५ – शिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त सी.पी राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला व ‘ज्ञानपर्व’ या विशेषांकाचे प्रकाशनन करण्यात आले. हा कार्यक्रम सिंबोयसिस विश्वभवन हॉल, सेनापती बापट रोड, छत्रपती शिवाजीनगर, पुणे येथे घेण्यात आला.

 

या वेळी प्रमुख उपस्थिती – सी.पी राधाकृष्णन, राज्यपाल, महाराष्ट्र; शाहू छत्रपती महाराज खासदार, कोल्हापूर; अभिजीत पवार व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह; सम्राट फडणीस, संपादक, सकाळ माध्यम समूह; प्रशांत नादनवरे; अंकित काणे; संजीवनी मुजुमदार; डॉ. स्वाती. एस. मुजुमदार,प्रधान संचालक, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी; डॉ. विद्या येरवडेकर,प्रधान संचालक, सिंबायोसिस हे उपस्थित होते.
स्वागत पर भाषणात सम्राट फडणीस म्हणाले,” डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा हा प्रवास एक पर्वच म्हणावा लागेल, एक व्यक्ती आणि संस्थेची एकरूपता हि डॉ. मुजुमदार सरांमध्ये अनोखी आहे, “वसुधैव कुटुंबकम” हि संकल्पना त्यांनी जगत खुपच उत्तम रित्या प्रत्यक्षात आणली. डॉ. मुजुमदार सर हे कितीही प्रसिद्धी झोतात गेले तरी त्यांना नेहमी एक सामान्य माणूस म्हणून प्रभाव पाडणे हे नेहमीच पसंत होते. आणि त्याच्या कॉलेजच्या प्रांगणातील कॉमन मॅनचा पुतळा हीच संकल्पना स्पष्ट करतो. अशा सध्या पण ध्येय गाठून त्याच्या विस्तार करणाऱ्या व शौक्षाणिक उतकृष्टेचा ध्यास घेतलेल्या डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचे मी अभिनन्दन करतो.”

अभिजीत पवार म्हणाले, ” दादा हे आजच्या काळातील माउलीच आहेत, कारण एका विद्यार्थ्याची वेदना बघून “वसुधैव कुटुंबकम” हि भावना त्यांच्या मनात आली. हि एक मनाची अवस्था आहे हि भावना सगळ्यानं येऊ शकत नाही. दादांमध्ये काय आहे कि एवढी मोठी युनिव्हर्सिटी त्यांनी उभी केली. संतुलित जीवन कसं जगायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. पंचेंद्रियांच्या पलीकडील अनुभूती त्यांच्या कडून मिळते. दादांचा प्रवास ज्ञानी ते ज्ञानयोगी अशा आहे. आज समाजा मध्ये ज्ञानाच विद्यापीठ हे एक ज्ञानाच मंदिर होणं गरजेचं आहे तरच ते कैक दशके टिकेल. अध्यात्म आणि भक्ती एकत्र आणून आपण यशश्वी आयुष्य जगू शकतो याचा दादा एक उत्तम उद्धरण आहेत”.
शाहू छत्रपती महाराज म्हणाले ,” सिंबोयसिस हे खरोखर युनिव्हर्सल आहे. यामध्ये बहुजन समाजाला हि स्थान आहे. याचा मूळ गाभा मानवी समाज व्यवस्थितरीत्या स्थापनेचा आहे. डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा हा वाढदिवस हा विश्वाचा आनंद सोहळा आहे. डॉ. शां. ब. मुजुमदारहे एक विचारांचं विद्यापीठ आहे, आणि या विद्यपीठामध्ये ज्ञानदानाची ताकद आहे.”

सत्कारास उत्तर देताना डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले,” एवढ्या मोठया संख्येने उपास्थींनांना पाहून आनंद होत आहे. “मी कोण?” हा प्रश्न जसा मला पडला तास सगळ्यांनाच पडला पाहिजे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्याक्तींना तर पडलाच पाहिजे .परदेशी विद्यार्थ्यच्या अश्रूंने मला, मी कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि सिंबोयसिसची निव रोवली गेली आणि इथून माझ्या आयुष्याला कलाटनी मिळाली. आज ८५ देशांचे विद्यार्थी सिंबोयसिस मध्ये शिक्षण घेतात, हजारो परदेशी विद्यर्थी आणि भारतीय विद्यर्थी एकत्र शिक्षण घेतात त्या वेळी खरा “वसुधैव कुटुंबकम” चा प्रत्यय येतो आणि हा प्रवास असाच चालू राहावा हीच इच्छा.”

सी.पी राधाकृष्णन म्हणाले ,” डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी नव्वदी पार केली आणि ते नक्की १०० वर्ष पार करतील. या प्रवासात संजीवनी मुजुमदार यांनीं सरांना चांगली साथ दिली. संस्था हि फक्त नफा कमवण्यासाठी बंधू नये एक ध्येय ठरवून ते गाठावा या मध्ये स्वयं शिस्त महत्वाची. डॉ. शां. ब. मुजुमदार सरांचा हा वटवृक्ष असाच विस्थराव या शुभेच्छा देतो.”

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!