पीसीसीओइआर येथे राष्ट्रीय स्तरावरील इन्सेप्टिया हॅकेथॉन स्पर्धा संपन्न
इन्सेप्टिया हॅकेथॉन मध्ये सायलेंट ब्रिज टीम प्रथम
पिंपरी, पुणे (दि. ३० जुलै २०२५) ‘इन्सेप्टिया हॅकेथॉन २०२५’ ही राष्ट्रीय स्पर्धा अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना, नव उपक्रम, तांत्रिक कौशल्य सादरीकरण यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देते. ही स्पर्धा फक्त जिंकण्यासाठी नसून राष्ट्राच्या तांत्रिक विकासात योगदान देण्यासाठी सहभाग घेण्याची एक संधी आहे असे पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट च्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओइआर) येथे राष्ट्रीय स्तरावरील इन्सेप्टिया हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सायलेंट ब्रिज टीमने प्रथम क्रमांकासह २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. या टीम मध्ये पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या नेहा जगताप, मानसी साबळे, मिताली दहिफळे आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रितेश चौधरी यांचा समावेश होता. वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेजच्या टीम डीएमएस ने द्वितीय क्रमांक मिळवून १५ हजार रुपयांचे बक्षीस आणि पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या टीम लोकलहोस्ट ने तृतीय क्रमांक मिळवून १० हजार रुपयांचे बक्षीस मिळवले.यावेळी उपसंचालक डॉ. राहुल मापारी, विद्यार्थी कल्याण विभाग अधिष्ठाता डॉ. महेंद्र साळुंखे, संगणक विभाग प्रमुख डॉ. विजय कोटकर, आयटी विभाग प्रमुख संतोषकुमार चौबे, विद्यार्थी संघटनाप्रमुख अथर्व सातपुते उपस्थित होते.
डॉ. तिवारी यांनी सांगितले की, पीसीईटी नेहमीच उच्च तंत्रज्ञान, कला आणि शैक्षणिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील असते. या स्पर्धेत आरोग्य सेवा, शिक्षण, वेब ३, फिनटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ओपन इनोव्हेशन या विषयाशी संबंधित सर्जनशील आणि तांत्रिक कौशल्य प्राप्त असणारे प्रकल्प सादर करण्यात आले. समन्वयक म्हणून करण मालोरे, अथर्व सातपुते, आदित्य वाघमारे, राजस नांदेडकर, सृष्टी पाटील, मानसी चित्राल, श्रीराज डोंगरे या विद्यार्थ्यांनी काम पाहिले.प्रास्ताविक डॉ. संतोषकुमार चौबे, आभार प्रा.भावना भदाणे यांनी मानले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यांनी
विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.