spot_img
spot_img
spot_img

मोशी येथील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची निष्कासनाची कारवाई

 

पिंपरी, दि. ३० जुलै २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इ क्षेत्रीय कार्यलयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. ३ मोशी येथील गट क्र. २५०,ऑस्ट्रिया इमारत जवळ, देहू -आळंदी रस्ता येथील अंदाजे १८०५१ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली १६ अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.या कारवाईमध्ये अनाधिकृत पत्राशेड व अनधिकृत बांधकामांचा समावेश होता.

 

शहरात नव्याने वाढती अनाधिकृत बांधकामे व विनापरवाना व्यावसायिक पत्राशेड हटविण्यासाठी इ क्षेत्रीय कार्यालय धडक कारवाई पथक व अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण नियंत्रण विभागामार्फत मोशी येथे आज अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम व क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते, उपअभियंता राजेश जगताप,कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, कनिष्ठ अभियंता क्षितीजा देशमुख यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथक तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार,अतिक्रमण निरीक्षक प्रविण लांडे,बीटनिरीक्षक सचिन पाटील,आदिनाथ नागरे, दत्तात्रय छडीदार, शिवानी भगत, भाग्यश्री वंजारे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
…..

चौकट – अनाधिकृत बांधकाम निष्कानाच्या कारवाईमध्ये सहभागी यंत्रणा

अतिक्रमण धडक कारवाई पथकामध्ये कार्यकारी अभियंता १, उपअभियंता १, कनिष्ठ अभियंता १, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे २३ जवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक १, पोलीस उपनिरीक्षक १, पोलीस अंमलदार ३५, मजूर कर्मचारी ९, कंत्राटी मजूर ५ या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. ३ जेसीबी, अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या आहेत. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!