पिंपरी चिंचवड शहरात दि. २९ जुलै २०२५ रोजी रावेतमधील शिंदे वस्ती परिसरात ‘MUTHOOT FINANCE’ या नामांकित वित्तीय संस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन भाजप नेते दीपक भोंडवे हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी रावेत शाखेचे प्रमुख, रावेत-काळेवाडीचे मा. मंडळ अध्यक्ष मा. श्री. सोमनाथ भोंडवे, कु. ओंकार भोंडवे, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
मुथूट फायनान्स ही एक विश्वासार्ह वित्तीय सेवा संस्था असून, ती मुख्यतः सोन्यावर कर्ज (Gold Loan) तसेच इतर विविध वित्तीय सेवा नागरिकांना पुरवते.सदर शाखा हि आर्थिक समावेशनाच्या दिशेने एक पाऊल असून रावेत परिसरातील नागरिकांसाठी ही शाखा निश्चितच उपयुक्त ठरेल, अशा भावना या वेळी दीपक भोंडवे यांनी व्यक्त केले.