पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी खंडोबा चौक येथे महा मेट्रोचे काम सुरू आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाची युवा नेते विशाल काळभोर यांनी केली आहे.
शहरातील आकुर्डी खंडोबा चौक येथे महा मेट्रोचे काम सुरू आहे त्या वाहतूक कोंडी बाबत उपाय योजना करावी तसेच वळण घेऊन चिंचवड कडे जातांना मध्येच लाल सिग्नल लागल्याने ट्रॅफिक पोलिस यांचे बरोबर वादावादी होते . चिंचवड ते आकुर्डी व आकुर्डी ते पुन्हा चिंचवड या मार्गावर पत्रे लावल्याने रस्ता अरुंद झाला आहे . यासाठी बी.आर. टी मार्गातून वाहतूक करण्यास परवानगी मिळावी (चौक परिसर) आकुर्डी. तसेच खंडोबा मंदिरा समोरील जय मल्हार चौक खडी मशीन येथेही सर्कल मोठा आहे . त्याचा व्यास कमी करणे तेथे सिग्नल लावून वाहतूक कर्मचारी नेमावा अशी मागणी चे निवेदन विशाल काळभोर यांनी पोलिस निरीक्षक यांना पत्र दिले.