आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे
शबनम न्यूज | प्रतिनिधी
“लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे स्वातंत्र्य आणि समतेचे पुजारी आहेत. महापुरुषांना जात धर्म देश यांच्या सीमा नसतात. ते सकल मानव जातीच्या कल्याणासाठी ते पूर्ण विश्वाला समर्पित असतात. म्हणून महापुरुषांना जातीच्या जाणव्यात बंदिस्त करणे हे सांस्कृतिक पाप आहे. महापुरुषांच्या सामर्थ्याची बेरीज करणे म्हणजेच विश्वाचे कल्याण करणे. त्यामुळे अनेक महापुरुषांचे थोर काम समाजापर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे.” असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची परिषदेत व्यक्त केले. डॉ.श्रीपाल सबनीस हे या परिषदेच्या अध्यक्षास्थानी होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर,मातंग साहित्य परिषेदेचे अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, अण्णा धगाटे, संदीपान झोंबाडे, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. सुनील भंडगे,डॉ.संतोष रोडे इत्यादी उपस्थित होते.
तर पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले की ,लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. अग्रलेख लिहून समाजात जागृती केली परंतु या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.सर्व महाम्हणुन आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.”
तर डॉ.पराग काळकर म्हणाले,”विद्यापीठाचे काम केवळ शिक्षण देण्याचे नसून,विद्यापीठाला त्यासह समाजिकसुधारनेचे ही काम करायचे आहे. प्रत्येक माहापुरुषाने आपल्याला विधायक विचार दिला आहे आणि तो समाजापर्यंत पोहोचवायचा आहे”
डॉ.संजय तांबट ” आगरकरांचा विचार हा बुद्धी प्रामाण्यवादी आहे स्वातंत्र्य समता आणि आर्थिक प्रश्न यावर त्यांनी भर दिला. सर्व महापुरुषांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.
तर “महर्षी वि.रा.शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण्याचे कार्य हाती घेताना माणसं जोडली.त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनरी स्थापना केली, विद्यार्थी शिक्षणाची चळवळ सुरु केली पुणे येथे अहिल्याश्रम नाना पेठ येथे विद्यालय सुरु केले.स्री शिक्षणाचा प्रसार केला त्यांना आधार देण्यासाठी व्यवसाय सुरू केले.वस्तीगृह काढले.”असे मत आण्णा धगाटे यांनी मांडले.
सामाजिक कार्येकर्ते संदिपान झोंबाडे म्हणाले, की “श्रीपाद अमृत डांगे यांच्यामुळे ते लोकचळवळीत आले. लोकांचे प्रश्न, वेदना मांडून ते लोकशाहीर झाले. त्यांनी साहित्यात मांडलेले प्रश्न, वेदना, समस्या प्रत्येकाला आपल्या वाटल्या, त्यामुळे ते लोकांचे नेते आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि मराठीसाठी अण्णा भाऊ यांचे योगदान फार मोठे आहे. त्याला विसरून चालणार नाही.”
डॉ. धनंजय भिसे यांनी कार्यक्रमाची संकल्पना व भूमिका मांडत असताना म्हणाले की,” सर्व महापुरुषांच्या विचारात लोककल्यानाची भूमिका आहे.ह्यांचे विचार भारताला विश्वगुरू होण्यासाठी महत्त्वपुर्ण असणार आहेत.”
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कारा हा डॉ. आगतराव अवघडे, उत्तम दंडीमे, युवराज कलवले,मुरलीधर झोंबाडे, एडवोकेट राणी सोनवणे,सुनिल लांडगे, कमलाकर वढेलकर, डॉ. यशवंत इंगळे, मानसी चिटणीस,डॉक्टर विजय रोडे राजाराम अस्वरे,सुरेश कंक, डॉ. अशोक मोरे,सागर काकडे, गणेश आवटे,ज्योती भिसे, संजय श्रीधर कांबळे,अरविंद भोसले, भारत टिळेकर, शंकर मानवतकर, गणेश भिसे,डॉ.किरण जाधव डॉ बुध्दाजी गाडेकर इत्यादींना प्रदान करण्यात आला.