शबनम न्यूज | प्रतिनिधी
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उद्योगनगर येथील कामगार कल्याण केंद्र मध्ये रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये बीपी, शुगर आणि सर्दी, खोकला, ताप, थंडी ,अंग दुखी, पाठ दुखी याची तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये ७५ जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी डॉ मृणाल फोंडेकर डॉ नीरज पाटील डॉ विनायक सेनवेकर यांनी तपासणीसाठी मदत केली. लक्ष्मी मेडिकल चिंचवडगाव सप्तशृंगी मेडिकल काळेवाडी राहुल मेडिकल प्राधिकरण यांनी औषधांसाठी मदत केली. या शिबिराचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद पाथरे मनोहर कड प्रिया पुजारी सायली सुर्वे संध्या स्वामी आनंद पुजारी जयवंत सूर्यवंशी मोहिनी सूर्यवंशी मीनाक्षी मेरूकर कल्पना तळेकर विद्या भागवत यांनी केले होते.