शबनम न्यूज | प्रतिनिधी
संकल्प सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बापु दिनकर कातळे यांनी बापदेव महाराज लॉन्स येथे दिनांक २७ जुलै रोजी ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा’ आयोजित केला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष बापु दिनकर कातळे यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार सायकल, घड्याळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सायकल शारीरिक विकासासाठी, तर घड्याळ वेळेच्या नियोजनाचे महत्त्व दर्शवण्यासाठी भेट देण्यात आली.
बापु दिनकर कातळे यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण अभ्यास आणि वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. “विद्यार्थ्यांच्या यशात शाळा, शिक्षक आणि पालकांचे सामूहिक योगदान असते,” असे ते म्हणाले.
प्रमुख वक्ते ह. भ. प. शेखर महाराज जांभुळकर यांनी पालकांना मुलांशी मैत्रीचे नाते ठेवण्याचा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा सल्ला दिला. हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि पालकांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची मागणी केली.
यावेळी ह.भ.प. शेखर महाराज जांभुळकर, प्रतापराव गुरव, अशोकभाऊ तरस, गोरखदादा तरस, अंकुशभाऊ तरस, जनार्धनभाऊ गाडे, बाळासाहेब विष्णू तरस, रवींद्रभाऊ कदम, नवनाथभाऊ तरस, दिलीपभाऊ तरस, दिलीपभाऊ दांगट, रोहितभाऊ माळी, अक्षयभाऊ तरस, अतुलभाऊ तरस, दिनकरभाऊ तरस, दीपकभाऊ दांगट, अरविंदभाऊ सांडभोर, सुनीलभाऊ कांबळे, मधुकर सर धाईंजे, हनुमंत राऊत, संदीप साळुंके, संदीप कातळे, दिलीप जाधव, बाळकृष्ण कातळे, रामहरी टिळेकर, महाले काका, अशोक कातळे, तयप्पा धनगर, संतोष म्हस्के, सागर निकाळजे, शुभांगीताई वानखेडे, अर्चनाताई राऊत, सुनीताताई चंदणे, चंद्रशेखर दादा कातळे, ज्ञानेश्वर शेळके, सुरेश वैरागर, हरिभाऊ बावीस्कर, सुनील धुमाळ, लीलाधर पानझाडे, भरत शिवणकर, जनार्धन वायदंडे, प्रल्हाद खरात, बाळासाहेब सर धावरे, सागर काटे, नामदेव कुंभार, रोहित बोरगे, संतोष सदाशिव तरस, देवराम भेगडे, केशव चाटे, आशिष सर बंसल, दिलीपभाऊ कडलक, अशोक चव्हाण, किरण कांबळे, अशोक अंभोरे, रापे भाऊ सूर्यवंशी, वैभव कांबळे, संदीपभाऊ तरस, चंद्रभान गाडे, वैशालीताई वाकचौरे, माधुरीताई साळवे, रमेश कांबळे (पत्रकार), सर्जेराव शिंदे, राजुभाऊ आगळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.