शबनम न्यूज | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशु विहार व नूतन माध्यमिक विद्यालय सांगवी या शाखेतील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी दोन हजार राख्या तयार केल्या आहेत. या राख्यानी भरलेला बॉक्स कारगिल विजय दिनी 15 मराठा लाईफ इन्फट्रीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी
15 मराठा लाईफ इन्फट्री ओंध कॅम्प चे सुभेदार किरण लोंढे यांनी कारगील विजय दिन कार्यक्रमात या राख्याचे बॉक्स स्विकारले या राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले हे होते.
यावेळी सुभेदार किरण लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आम्ही युद्धभूमीवर असतो; त्यावेळी यश मिळते की नाही हे माहीत नसते;पण जिंकणार आम्ही हीच भावना घेऊन आम्ही युद्ध करतो म्हणूनच आम्ही कारगील मध्ये विजय मिळवू शकलो. हीच भावना घेऊन आम्ही ऑपरेशन सिंदूर राबविले आणि शत्रूला सळो की पळो करून सोडले आणि विजय मिळवला. आपण स्वप्नांना सत्यात उतरायचे असेल तर ती व्यवस्थित पहावी लागतात तरच ती पूर्ण होतात. जीवनात यश अपयश येतच राहते विद्यार्थ्यानी अपयशाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे व यश मिळो पर्यंत प्रयन्न करावे कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. प्रत्येकाने एक स्वप्न उराशी बाळगून घाबरून न जाता प्रयत्न करावे .यश नक्कीच मिळेल असे ते म्हणाले .
या कार्यक्रम प्रसंगी हवालदार तुषार जगताप, सेना मेडल विजेते शिवाजी भुसारे,शिपाई साळुंखे, संस्थेचे सचिव तुळशीराम नवले ,खजिनदार रामभाऊ खोडदे , सदस्य प्रकाश ढोरे, जयप्रकाश जंगले शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.