spot_img
spot_img
spot_img

शहरातील धर्मांतराच्या विरोधात आमदार उमा खापरे आक्रमक !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात धर्मांतराच्या घटनेनंतर आमदार उमा खापरे या आक्रमक झाल्या आहे त्यांनी नुकतीच पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त यांची भेट घेतली व धर्मांतर करणाऱ्या भ्रष्ट लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नुकतेच पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनातही धर्मांतरण विरोधी कायद्यावरून अनेक बाबी आमदार उमा खापरे यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. तसेच धर्मांतर कायदा लवकरात लवकर करावा, अशी मागणी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात नुकतेच धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये सिंधी समाजाचे धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समजले, पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली. परंतु पिंपरी चिंचवड शहरात असे अनेक धर्मांतर करणारे भ्रष्ट लोक असतील, अशा लोकांची लवकरात लवकर चौकशी व्हावी. तसेच महाराष्ट्रातील ख्रिश्चन मिशनरी अशा पद्धतीने हिंदूंचा धर्मभ्रष्ट करण्याचाही प्रयत्न करत आहे. या लोकांना के कोणती संस्था उभी आहे, कोणत्या संस्थेचे अंतर्गत हे काम सुरू आहे. आपल्या देशात येऊन हे आपल्या लोकांचे धर्म परिवर्तन करतात याची माहिती पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. अशा धर्मांतर करणाऱ्या लोकांची चौकशी करावी, जे तीन लोक धर्मांतर करण्याच्या घटनेत पोलिसांच्या ताब्यात आहेत. या लोकांची कसून चौकशी करावी, अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

पोलीस आयुक्तालयाकडूनही आमदार उमा खापरे यांच्या मागणीला सकारात्मक असे उत्तर देत सदर धर्मांतर घटनेत अटक झालेल्या इसमांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल मधून आणखी काही माहिती समोर येईल, त्या आधारे या घटनेची चौकशी पुढे करता येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त यांच्यामार्फत देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!