शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात असलेल्या मोरया बँक्वेट हॉल येथे, सालाबादप्रमाणे यंदाही इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या थेरगाव परिसरातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव केला.
याशिवाय या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. हरिश्चंद्र थोरात,रोहित कोटकर, प्रियांका जाधव, निकिताताई शिर्के, रेखा राठोड या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तमरित्या आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी व करिअर बाबत मार्गदर्शन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीत योग्य दिशा निवडण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील संधींचा वेध घेण्यासाठी हे मार्गदर्शन निश्चितच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.
यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते. शिवाय समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार होते, असे मत यावेळी व्यक्त केले. तसेच, थेरगाव परिसरातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून करिअर मार्गदर्शन करण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल अभिषेक बारणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत कौतुक केले.
यावेळी निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मा.नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, तानाजी बारणे, मा.नगरसेविका मनीषाताई पवार, प्रमोद पवार, मंडल अध्यक्ष सनी बारणे, मा.स्वीकृत सदस्य संदीप गाडे, सोनालीताई गाडे, प्रज्ञाताई बारणे, करिष्माताई बारणे, सीमाताई चव्हाण, हरीश मोरे, संजय गांधी योजनेचे नरेंद्र माने, रवी भिलारे, आप्पा ठाकर यांच्यासह इत्यादी मान्यवर सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.