शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 14 येथे वृक्षारोपण व आकुर्डी मनपा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड मधील शिवसैनिकांनी अनोख्या पद्धतीने सामाजिक वृक्षारोपण व रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून केला.
यावेळी शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शिवसेना महिला संघटिका रूपाली आल्हाट, माजी नगरसेविका मीनल यादव, युवासेना प्रमुख चेतन अण्णा पवार, उपशहर प्रमुख अमोल निकम, युवराज कोकाटे, उद्योजक सोमनाथ दादा काळभोर, विभाग प्रमुख सतीश मरळ, गोविंदराव शिंदे, दीप्ती काळभोर ,सुमित निकाळजे यांच्या हस्ते वृक्षारोपण व फळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन अमोल पुन्नासे कृष्णा माने प्रीतम तेलंग, जीवन वाघमारे, नवनाथ शिंदे, यज्ञेश वाघमारे, विशाल शिंदे, ओम मते यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख निखिल उमाकांत दळवी यांनी केले होते.