शबनम न्यूज | प्रतिनिधी
शनिवार दि.२६/०७/२०२५ निगडी,रावेत, पुनावळे आणि बालेवाडी या भागातील विद्यार्थ्यांसाठी Cambridge International स्कूल आणि CHAMPS यांच्या संयुक्त विद्यमाने ग.दि.माडगूळकर सभागृह,निगडी प्राधिकरण याठिकाणी आयोजित करण्यात आलेला ‘Happy Father’s Day’ विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून “शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापु) काटे” उपस्थित होते.
शत्रुघ्न काटे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, “वडिलांचे मोल केवळ आर्थिक आधारापुरते नसून,ते कुटुंबाचे खंबीर बळ असतात.शाळांनी अशा उपक्रमांद्वारे पालकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या भावना जपल्याबद्दल कौतुक करावं लागतं.”
फादरस् डेच्या निमित्ताने आयोजिलेला हा भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम उपस्थित सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय वर्नेकर, संचालक शीतल धनंजय वर्नेकर,उद्योजक विरेंद्रसिंह शितोळे,चेतन भुजबळ,सौ. सोनाली कुटे (HOD,CHAMPS),सौ सविता चौधरी,सौ.विमला चौधरी,सौ.रोहिणी सहारे,सौ. तृप्ती घाडगे,श्री.सिद्धांत माने तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.