spot_img
spot_img
spot_img

चिंतामणी महिला बचत गटाच्या वतीने जवानांना राखी भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील चिंतामणी महिला बचत गटाच्या वतीने सीमेवरील जवानांना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त राखी सप्रेम भेट म्हणून पाठविण्यात आली. आपल्या देशातील भारतीय सैन्य अर्थात जवान आपल्या देशाच्या सीमेवर रात्रंदिवस आपल्या देशाचे रक्षण करतात, आपले भारतीय सण ते भारतीय सीमेवरच साजरे करतात, त्यांच्यामुळेच आपण देशात सुरक्षित आहोत.

एक भाऊ जशा प्रमाणे आपल्या बहिणीची रक्षण करतो तसेच भारतीय जवान हे भारतातील देशवासीयांचे रक्षण करतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता चिंतामणी महिला बचत गटा वतीने जवानांसाठी राखी सप्रेम भेट म्हणून पाठविण्यात आली. यावेळी बचत गटाच्या अध्यक्ष प्रचिती भीषणुरकर, उपाध्यक्ष वनिता मोहिते, सदस्या चित्रा कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!